
कोणत्याही यात्रेकरुंची गैरसोय होणार नाही, याची काळजी सर्व महामंडळातील अधिकारी-कर्मचारी घेत आहेत. कर्नाटक राज्यातील वाहतूकीसाठी तुळजापूर आगारातील नवीन बस स्थानक हे वाहतूकीचे केंद्र आहे. कोजागिरी पौर्णिमा वाहतूकीसाठी नियोजनासाठी 25 अधिकारी यांच्यासह 145 पर्यवेक्षकीय कर्मचारी तसेच मार्ग तपासणी कामासाठी 36 पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
लातूर औसा मार्गावर नवीन बस स्थानकाऐवजी कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावरुन पार्कीगसह, सोलापूर मार्गावर तुळजापूर आगारातील शेडवरुन प्रतिवर्षाप्रमाणे पार्कीग, तुळजापूर आगारात केवळ उस्मानाबाद विभाग,हेलीपॅड येथे उर्वरित सर्व विभाग तर उस्मानाबाद व बार्शी मार्ग हे जुन्या बस स्थानकावरुन पार्कीगसह सोयउपलब्ध करुन देण्यात आली आहे.
कोजागिरी पोर्णिमा वाहतूकीच्या मार्गात बदल असून कर्नाटक राज्यातील वाहतूक हुमनाबाद,गुलबर्गा व उमरगा या मार्गावरील वाहतूक तुळजापूर-पाटोदा फाटा-लोहारा-माकणी-नारंगवाडी-चौरस्ता-उमरगा या मार्गाने तर सोलापूर या मार्गावरील वाहतूक तुळजापूर-मंगरुळ फाटा-टेलरनगर-इटकळ-बोरामणी-सोलापूर या मार्गाने केली जाईल. तसेच तुळजापूर-उस्मानाबाद-नारी चिखर्डे-बाशी या मार्गानेही बार्शीची वाहतूक केली जाईल.
भाविक हा केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठी एस.टी.महामंडळाच्या वतीने जुन्या बस स्थानकावर तसेच नवीन बसस्थानकावर 24 तास वाहतूक नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, सुरक्षिततेसाठी बसस्थानकावर पोलीस चौकी, जुन्या बसस्थानकावर क्लॉक रुमची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी आगाऊ आरक्षण कक्ष उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. सुरक्षित प्रवासासाठी राज्य परिवहन भाविकांना एस.टी. बसेसनेच प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले.