पांगरी (गणेश गोडसे) :- वाचनाने माणूस प्रगल्भ होतो,वाचनामुळेच माणूस वाचतो त्यासाठी लहानपणापासूनच वाचन गरजेचे असल्याचे प्रतिपादन बार्शी पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.कौशल्या माळी यांनी केले.त्या पांगरी ता.बार्शी येथे नवरात्र मोहोत्स्वानिमित्त जय भवानी मित्र मंडळातर्फे घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेच्या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण प्रसंगी बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी सरपंच विजय गोडसे होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजन व दिप प्रज्वलनाने करण्यात आली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यासपीठ निर्माण करून देण्याच्या हेतूनं घेण्यात आलेल्या स्पर्धेत कु.करुणा रत्नाकर सरडे हिने सादर केलेल्या दुष्काळग्रस्त शेतकरी या विषयास प्रथम,कु.स्नेहल नवनाथ क्षीरसागर हिने सादर केलेल्या 'मुली वाचवा देश वाचवा' या विषयास द्वितीय,तर कु.रोहिणी दातात्रय गोडसे हिने मांडलेल्या 'झाडे लावा झाडे जगावा या विषयास'तृतीय क्रमांक मिळाला.बक्षीस विजेत्यांना विजय गोडसे स्वप्नील काळे,शशिकांत नारकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी राहुल गोडसे,प्रतिक गोडसे,सागर गोडसे,श्रीराम काकडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजित गोडसे,विश्वास काकडे,राजेंद्र नाईकवाडी,विलास गोडसे,यशवंत गोडसे,महेश पौळ आदींनी परिश्रम घेतले॰स्पर्धेचे परीक्षक म्हणून माजी सभापती कौशल्या माळी,पत्रकार गणेश गोडसे,रोहिणी वासकर यांनी काम पाहिले.