पांगरी (गणेश गोडसे) :- भाड्याने गाडी करून घेऊन येऊन चालक प्रातविधीसाठी थांबलेल्याची संधी साधून गाडीतीलच पाच अनोळखी तरुणांनी माढा तालुक्यातील  चालकाजवळील तवेरा गाडी,रोख रक्कम व मोबाइल हँडसेट असा पाच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शनिवार दि. 24 रोजी साडे सात वाजण्याच्या सुमारास बार्शी-भूम मार्गावरील आगळगांव ते धनगरवाडी रस्त्यावर घडली.परमेश्वर दगडू भुजबळ वय 39 रा.सापटणे ता.माढा (टे) यांनी यासंदर्भात पांगरी पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, काल परमेश्वर भुजबळ हे टेंभुर्णी (ता.माढा) येथे भाड्याची वाट बघत असताना त्यांच्याजवळ अनोळखी  पाच तरुणांनी येऊन आपल्याला बार्शीपासून पुढे दहा की.मी.अंतरांवर जायचे आहे असे सांगून गाडी भाड्याने केली.दरम्यान तवेरा गाडी क्रमांक एम.एच 45. 4955 ही बार्शीच्या पुढे आगळगांव-धनगरवाडी दरम्यान आली असता चालक प्रातविधीसाठी खाली उतरला.चालक गाडीत नसल्याची संधी साधून दोन मोबाइल हँडसेट रोख रक्कम व पाच लाख रुपये किमतीची तवेरा गाडी त्या अनोळखी तरुनांणी त्यांच्या समतीशिवाय लबाडीने चोरून नेली.भुजबळ यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरुण अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक राजू राठोड हे करत आहेत.
गाडी भाड्याने करून गाडीच लुटण्याचा प्रकार घडल्यामुळे वाहनचालकामधून खळबळ उडाली असून भविष्यात ओळखीशिवाय भाडे न घेण्याबाबतच्या चर्चेने वेग घेतला आहे.
 
Top