नळदुर्ग -: शासन शेतकरी व दुष्‍काळग्रस्‍तांच्‍या पाठीशी असून शेतक-यांच्‍या खात्‍यांवर साडे सातशे कोटी रुपये जमा करणारे एकमेव भाजप सरकार असल्‍याचे पाणीपुरवठा मंत्री ना. बबनराव लोणीकर यांनी नळदुर्ग येथे भाजप सरकारच्‍या वर्षपूर्ती निमित्‍त लोकसंवाद कार्यक्रमप्रसंगी बोलताना सांगितले.
ना. लोणीकर पुढे म्‍हणाले की, भविष्‍यात मुख्‍यमंत्री ग्रामसडक योजना, मुख्‍यमंत्री ग्रामीण पेयजल योजना राजाचा चेहरामोहरा बदलणार असल्‍याचे सांगून जलयुक्‍त शिवाराच्‍या माध्‍यमातून मराठवाड्यासह राज्‍य कायमस्‍वरुपी दुष्‍काळमुक्‍त करण्‍याचे मनोदय त्‍यांनी व्‍यक्‍त केले. राज्‍यात परकीय गुंतवणूक वाढत असल्‍यामुळे युवकांच्‍या हाताला मोठ्याप्रमाणावर रोजगार उपलब्‍ध होणार आहे, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, जिल्‍हाध्‍यक्ष नितीन काळे, अॅड. अनिल काळे, सुशांत भूमकर, विजय शिंगाडे, दत्‍ता कुलकर्णी, नळदुर्ग शहराध्‍यक्ष पद्माकर घोडके, विशाल डुकरे आदीजण व्‍यासपीठावर उपस्थित होते. यावेळी सचिन घोडके, भिमाशंकर बताले, सागर हजारे, श्रमिक पोतदार, बापू दुरुगकर, शंकर वाघमारे, अजय ठाकूर, आकाश घोडके, बालाजी घोडके, रवी ठाकूर, दादा जाधव, प्रमोद कोकणे, रिकी पिस्‍के, आनंद लाटे यांच्‍यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top