तुळजापूर :- महाराष्‍ट्राची कुलस्‍वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्‍या शारदीय नवरात्र महोत्सवास दि. 13 ऑक्टोबरपासून प्रांरभ होत आहे. 
         रविवार,दि.4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी श्रीदेविजींची मंचकी निद्रेस सुरुवात होणार आहे. मंगळवार दि. 13 ऑक्टोबर रोजी पहाटे श्रीदेवींजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना, दुपारी 12 वाजता घटस्थापना,ब्राम्हणांस अनुष्ठानाची वर्णी देणे व रात्री छबीना. बुधवार,दि.14 रोजी श्रीदेवीजींची नित्योपचार पुजा व रात्री छबीना. गुरुवार,दि.15 रोजी श्रीदेवीजींची नित्योपचार पुजा व रात्री छबीना. शुक्रवार,दि.16 रोजी श्रीदेवीजींची नित्योपचार पुजा व रात्री छबीना. शनिवार,दि.17 रोजी ललीता पंचमी श्रीदेविजींची नित्योपचार पूजा, रथ अलंकार महापूजा व रात्री छबीना. रविवार,दि.18 रोजी श्रीदेवीजींची नित्योपचार पुजा,मुरली अलंकार महापूजा व रात्री छबीना. सोमवार,दि.19 रोजी श्रीदेवीजींची नित्योपचार पुजा, शेषशाही अलंकार महापुजा व रात्री छबीना. मंगळवार,दि.20 रोजी श्रीदेवीजींची नित्योपचार पुजा, भवानी तलवार अलंकार महापुजा व रात्री छबीना. बुधवार,दि.21 रोजी दुर्गाष्टमी श्रीदेवीजींची नित्योपचार महापुजा व  महिषासुर मर्दिनी अलंकार महापुजा, सकाळी 8 वाजता वैदिक होमास व हवनास आरंभ, दुपारी 1.40 वाजता पूर्णाहुती व रात्री छबीना. गुरुवार,दि.22 रोजी महानवमी श्री देविजींची नित्योपचार पुजा, दुपारी 12 वाजता होमावर धार्मीक विधी, घटोत्थापन, सायंकाळी सार्वत्रिक सीमोल्लंघन, विजयादशमी (दसरा) शमीपुजन व रात्रौ नगरहून येणारे पलंग पालखीची मिरवणूक. शुक्रवार,दि.23 रोजी उष:काली श्रीदेवीजींचे शिबिकारोहण, सीमोल्लंघन मंदिराभोवती मिरवणूक व मंचकी निद्रा. सोमवार, दि.26 रोजी कोजागिरी पोर्णिमा रात्री श्रीभवानी मातेची सिंहासनावर प्रतिष्ठापना. मंगळवार,दि.27 रोजी मंदिर पोर्णीमा श्री देविजींची नित्योपचार पुजा व रात्री सोलापूरच्या काठयासह छबीना आणि बुधवार,दि. 28 ऑक्टोबर,2015 रोजी श्रीदेवींची नित्योपचार पुजा, अन्नदान महाप्रसाद व रात्री सोलापूरच्या काठयासह छबीना.
            या यात्रेस महाराष्ट्र, कर्नाटक अशा विविध राज्यातून भाविक श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी येतात. सर्व भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा डॉ. प्रशांत नारनवरे  यांनी केले आहे. 
 
Top