येरमाळा (संतोषकुमार जाधवर) :- चोराखळी (ता. कळंब) येथे बाळासाहेब भगवान मैंदाड वय ५५ वर्षे या शेतकर्‍याने स्वतःच्या चोराखळी शिवारातील शेतामध्ये आंब्याच्या झाडाला साडीच्या पटकराने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. 
       याबाबत येरमाळा पोलिस ठाण्यात जालिंदर मैंदाड (रा.चोराखळी) यांनी दिलेल्या माहीतीवरुन येरमाळा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे. तो शेतकरी कर्जबाजारी आहे की नाही हे तपासात स्पष्ट होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पुढील तपास हे.कॉ.शिंदे हे करीत आहेत.
 
Top