उस्मानाबाद -  मुंबईतील इंदू मिलच्या जागेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन झाले. त्याबद्दल उस्मानाबादमध्ये भीमसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी विशाल शिंगाडे, भीमा जाधव, अनिल मंजुळे, सागर चव्हाण, प्रशांत कांबळे, अतिष बनसोडे, अविनाश शिंगाडे, संजय पांडे, आशीष चिलवंत, विकी सपकाळ, राजपाल गायकवाड, सचिन शिंगाडे आदी उपस्थित होते. (छाया - राहुल कोरे)

 
Top