उस्‍मानाबाद - तालुक्यातील वरवंठी येथील ग्रामीण पाणी पुरवठा समितीच्या अध्यक्षपदी शिवसेना - भाजपाच्या  ज्योती राम बेद्रे तर सचिवपदी नसिबा गफार शेख यांची निवड झाली आहे.
   वरवंठी येथे ग्रामीण पाणी पुरवठा समितीच्या अध्यक्ष व सचिवांची निवड करण्यासाठी आज गावच्या नुतन सरपंच स्वाती शहाजी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा बोलविण्यात आली होती. यावेळी कुणाच्याही नावावर एकमत न होवू शकल्यामुळे शेवटी मतदान घेण्यात आले. यावेळी ग्रामीण पाणी पुरवठा समितीच्या अध्यक्षपदासाठी ज्योती राम बेद्रे व युवराज देशमुख यांच्यात तर सचिवपदासाठी नसिबा गफार शेख यांच्याविरुध्द गणवती बेद्रे यांच्यात लढत झाली. 
यावेळी गुप्त पध्दतीने मतदान घेतल्यानंतर अध्यक्षपदासाठी ज्योती राम बेद्रे यांना २५० तर युवराज देशमुख यांना २०० मते मिळाली. तसेच नसीबा गफार शेख यांनाही २५० तर गणवती बेद्रे यांना २०० मते मिळाली. 
यावेळी शिवसेनेच्या वडगाव गटाच्या जि.प.सदस्य सुषमा देशमुख, यांच्यासह गावच्या उपसरपंच अर्चना विश्वनाथ कांबळे, कालिदास बेद्रे, बसन्ना बेद्रे, डॉ. राजेंद्र सरवदे, उमाकांत साळुंके, लक्ष्मण देशमुख, विठ्ठल कांबळे, राहिबाई जाधव, दिलीप शेळके यांच्यासह ग्रामसेवक गोरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्‍थित होते. 
 
Top