संध्याकाळच्या हेडलाईन्स - २ ऑक्टोबर २०१५
 ~~~~~~~~~~~~~~
🌀राज्यातील अनेक भागात पावसाचे दमदार हजेरी; पुणे परिसरात सकाऴपासून तर औरंगाबाद आणि कोकणात वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाची सुरुवात.

🌀 उद्यापासून फिल्म फेडरेशनने बेमुदत संप पुकारला असून यामध्ये फेडरेशनच्या २१ शाखांचा समावेश आहे. 

🌀अहमदनगर: शहरात आज दुपारपासून संततधार पाऊस, वातावरणात गारवा आल्याने नगरकर सुखावले

🌀अहमदनगर: पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी येथे अलिशान ईब्राहिम शेख या महिलेचा अंगावर वीज पडल्यामुळे मृत्यू, जिल्हा आपत्ती विभागाने दिली माहिती

🌀नाशिक: जवाहरलाल नेहरू इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (JIT) कॉलेजच्या परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला, पोलिसांकडून तपास सुरू!

🌀पुण्यात लाचखोरीप्रकरणी अटकेत असलेले उपमुख्य अभियंता शिरीष यादवला ५ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी. 

🌀देशाला प्रगतीच्या वाटेवर न्यायचे असेल तर बिहारचा विकास होणे गरजेचे आहे - नरेंद्र मोदी

🌀समीर गायकवाड जर दोषी आढळला तर त्याला जरूर शिक्षा व्हावी आणि त्यावेळी सनातन संस्था त्याच्या मागे उभी राहणार नाही. - अभय वर्तक 

🌀अकोल्यातील तेल्हारा तालुक्यात बेलखेड गावात घराच्या माडीवरुन ढकलल्याने महिलेचा मृत्यू. 

🌀एअरटेलच्या 4जी जाहिरातीला ७ ऑक्टोंबरपर्यंत मागे घेण्याचे निर्देश, जाहिरातीतून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप. 

 🌀छत्तीसगडमधील जगदलपूर येथे नक्षलवाद्यांनी जवानाची गोळ्या झाडून हत्या केली. 

🌀मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक धीम्यागतीने, पुण्याकडे जाणा-या मार्गावर वाहनांच्या रांगा.

----------------------
✏ वृतसंकलन-भाऊ वलेकर
~~~~~~~~~~~~~~

 
Top