सकाळच्या हेडलाईन्स - ३ ऑक्टोबर २०१५ 
~~~~~~~~~~~~~~
✨ सोलापूर : आषाढी यात्रेत चांगली स्वच्छता ठेवल्याबद्दल जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, पंढरपूर न.प.चे मुख्याधिकारी शंकर गोरे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृहात सत्कार केला.

✨ सोलापूर : हुतात्मा एक्स्प्रेसला अतिरिक्त डबे जोडण्याबाबत मुंबई मुख्यालयात प्रशासनाकडून सकारात्मक चर्चा झाल्याचे अपर विभागीय व्यवस्थापक के. मधुसूदन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

✨ डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या मारेक-यांना' पकडण्यासाठी विलंब होत असल्याकारणामुळे सहा कन्नड साहित्यिक आपले पुरस्कार शासनाला परत करणार असल्याचे समजते

✨ अकोला : तेलहारा तालुक्यात माकडाने केलेल्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला असून याच माकडाने याआधी दोन मुलांवर हल्ला केल्याचे वृत्त होते. मात्र अद्यापही हे माकड मोकाटच असल्याचे समजते. 


✨ आता तो दिवसही दूर नाही जेव्हा ग्रामपंचायतीच्या निवडणुकादेखील भाजपा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लढेल. - नितिश कुमारांची खोचक टीका. 


✨ मुंबई : शीना बोरा खून प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिच्या छातीत दुखू लागल्यामुळे तिला जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

✨ द. आफ्रिकेचा भारतावर ७ विकेटने विजय  
----------------------
✏ वृतसंकलन-भाऊ वलेकर
~~~~~~~~~~~~~~
 
Top