पांगरी (गणेश गोडसे) बार्शी तालुक्यातील पांगरीजवळील पिंपळगांव (देशमुख) येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी झालेल्या सदस्य,सरपंच सोडतीत सलग पंचेवीस (25) वर्षापासून सर्वसाधारण गटाच्या कोणत्याच प्रवर्गासाठी एकही जागा न सुटल्यामुळे ग्रामस्थामधून संताप व्यक्त केला जात असल्याबाबत व तेथील ग्रामस्थांच्या मनातील खदखद मांडल्यामुळे सर्वसाधारण गटातील मतदारांनी मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. बहिष्काराच्या पार्श्वभूमीवर मतदारांचे मत परिवर्तन करण्यासाठी बार्शीचे तहसिलदार बालाजी सोमवंशी यांनी गावात जावून ग्रामस्थांशी संवाद साधला॰तहसीलदारांनी सदस्य व सरपंच आरक्षण सोडत याबाबत जनतेशी चर्चा करून त्यांचे मत परिवर्तन केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक (13) पासून पिंपळगांव (दे) येथील ग्रामपंचायतीसाठी प्रक्रिया सुरू आहे.मात्र महसूल विभागाच्या कामाचा अजब नमूना येथील लोकांना दिसून आला आहे.सरपंच पदाच्या दोन्ही जागेवर एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.सर्वसाधारण गटातील 35 टक्के मतदार गावात असूनही सलग पाचवी पंचवार्षिक निवडणूक सर्वसाधारण गटातील उमेदवारास ग्रामपंचायतीबाहेर ठेऊन पार पडत आहे.नेमकी चूक कोणाची,आरक्षण कश्या पद्धतीने टाकण्यात आले याबाबत गावात व मतदारात उलट सुलट चर्चिले जात होते. 2010 मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीतही सात जागांपैकी पाच जागेवरच उमेदवारांची निवड प्रक्रिया पार पडली होती.दोन जागा रिक्त राहिल्या होत्या.
सात सदस्य संख्या असलेल्या व 391 मतदार असलेल्या पिंपळगांव येथील सरपंचपद ओबिसी प्रवर्गासाठी आरक्षित असून 124 सर्वसाधारण गटातील आहेत.पिंपळगांव येथील 2015 च्या निवडणुकीतील आरक्षण प्रभाग क्रमांक एक मध्ये अनुसूचीत जाती पुरुष एक,महिला एक,प्रभाग क्रमांक दोन मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबिसी) एक पुरुष,एक महिला,प्रभाग तीन मध्ये अनुसूचीत जाती एक पुरुष, एक स्त्री,व अनुसूचीत जमाती महिला एक असे आरक्षण आहे.
2010 मध्ये पार पडलेल्या निवडणुकीसाठी अनुसूचीत जमातीच्या महिलेसाठी येथील सरपंच पद आरक्षित होते.त्यावेळेस प्रभाग क्रमांक एक येथे अनुसूचीत जाती पुरुष एक,स्त्री एक,प्रभाग क्रमांक दोन मध्ये अनुसूचीत जमाती स्त्री एक,अनुसूचीत जाती पुरुष दोन,प्रभाग क्रमांक तीन मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग एक स्त्री,एक पुरुष असे आरक्षण होते.त्यावेळसही सर्वसाधारण गटासाठी एकही जागा देण्यात आली नव्हती.प्रभाग तीन मधील दोन्ही जागा रिक्त होत्या.विशेष म्हणजे हे की दोन कुटुंबे,आठ मतदार यांच्यासाठी दोन जागा आरक्षित होऊ शकतात तर 124 मतदारांना लोकशाहीत हक्कांपासून दूर ठेवले आहे असा प्रश्न संबंधित जनतेला आहे॰आमच्या आडनावावरून ज्या गावाची ओळख आहे त्या गावातच आम्हाला जर ग्रामपंचायतीची पायरी चढण्याचा हक्क नाही का असा प्रश्न येथील नागरिकांकडून विचारला जात आहे.एक,दोन,तिन निवडणुका ठीक आहेत मात्र सलग 25 वर्ष आमच्यावर अन्याय का?
चौकट: जेवढ्या जागेवर अर्ज दाखल करण्यात आले आहेत तेथील जागा भरल्या जाणार असून ग्राम पंचायत आरक्षण अधिनियम 1958 मधील तरतुदीनुसार आरक्षण सोडत करण्यात आली आहे असे तहसीलदर श्री.सोमवंशी यांनी पिंपळगांव ग्रामस्थांशी झालेल्या भेटीनंतर पुढारी प्रतिनिधीशी बोलताना संगितले.