उस्मानाबाद - -वाचनाद्वारे ज्ञानसंपन्न समाज निर्माण करून सशक्त पिढी निर्माण करण्याचे कार्य ग्रंथ करतात आणि यातूनच राष्ट्राचा विकास घडवून येते, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्यकार्यकारी  अधिकारी बी.एन.उबाळे यांनी केले.
        माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय उस्मानाबाद यांच्यावतीने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कोषागार अधिकारी विशाल पवार, सहायक जिल्हा कोषागार अधिकारी ए.बी.पवार, लेखाधिकारी (कृषी विभाग) सी.ए.गुणले, जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील आदींची उपस्थिती होती.
         सरस्वती प्रतिमा पूजन आणि  डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आणि दीपप्रज्वलनाने या ग्रंथप्रदर्शनाचे उद्वाघाटन करण्यात आले. ग्रंथप्रदर्शनात डॉ.कलाम या यांचे साहित्य, तसेच इतर चरित्र, साहित्य, इतिहास, विज्ञान, स्पर्धा परिक्षा, प्रवास वर्णन आदी विविध विषयावरील ग्रंथ मांडण्यात आले होते. मान्यवरांनी या प्रदर्शनाचीही पाहणी केली.
            ग्रंथप्रदर्शनामुळे वाचत संस्कृती वाढीस लागुन सर्वच वयोगटांच्या वाचकांना मोठा लाभ होतो, अशा भावना यावेळी प्रमुख अतिथींनी व्यक्त केल्या. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात दरारोज बहुसंख्य वाजक वाचनाचा लाभ घेत असून अपुऱ्या जागेमुळे वाचकांना जागा कमी पडत असल्याचे श्री.पाटील यांनी सांगीतले.
         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथालय निरिक्षक श्री.ग.मा.कुरवाडे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यालयातील ह.रा.डेंगळे, हि.भ.बिरादार, शाहूराज भेरे यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी वाचक वर्ग उपस्थित होता. तसेच, वाचन प्रेरणा दिवसानिमित्त जिल्ह्यातील विविध सार्वजनिक ग्रंथालयातही ग्रंथप्रदर्शन भरविण्यात आले. ****
        पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
         उस्मानाबाद - जिल्हृयातील सर्व माजी सैनिकांना/विधवांना कळविण्यात येते की, केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांचेकडून शैक्षणिक वर्ष 2015-16 साठी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजेनेची घोषना करण्यात आलेली आहे. तरी जिल्हृयातील पात्र माजी सैनिक/विधवानी आपल्या पाल्यासाठी शैक्षणिक वर्ष 2015-16 मध्ये व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतले आहेत केले आहेत, त्यांनी आवेदन पत्र, चेकलीस्ट प्रमाणे सर्व कागदपत्रांसह दि. 10 नोव्हेंबर पर्यत जिल्हा सैनिक कार्यालय येथे सादर करावीत आवेदन पत्र चेकलिस्ट व इतर सर्व माहिती संकेत स्थळावर www.desw.gov.in. या वेबसाईटवर उपलब्ध आहेत, याची कृपया नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,उस्मानाबाद यांनी केले आहे. 
 
Top