उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यासाठी  माहे ऑक्टोबर 2015 करीता  केरोसीन  कोटा प्राप्त  झाल्यामुळे  झाल्यामुळे  100 टक्के  वाटपाचे  आदेश तालुकानिहाय, कंपनी एजंट निहाय, अर्धघाऊक, किरकोळ केरोसीन वितरण करण्यात येत आहे. नियतनाच्या वितरणाबाबत तालुक्यातील शिधापत्रीका  धारकांना  केरोसीनचा आश्वासीत  पुरवठा  करण्याबाबत दिलेल्या सुचनांप्रमाणे सर्व परवानाधारक यांचा समान टक्केवारी प्रमाणे केरोसीन कोटा निश्चीत  केलेला आहे.  त्यानुसार केरोसीन नियतन आदेश जिल्हाधिकारी,  यांनी जारी केले आहेत.
   नियतनामध्ये समाविष्ट असलेल्या किरकोळ  केरोसीन  परवानाधारकांच्या परवानांचे नुतनीकरण झाले असल्याची खातरजमा करुनच तहसीलदारांनी त्यांच्या स्तरावर नियतन देण्यात यावे. नियतन किरकोळ केरोसीन  परवानाधारकांना  कोणत्याही  परीस्थीतीत  त्यांना  जोडण्यात  आलेल्या कार्डधारकांच्या संख्येनुसार व जिल्हाधिकारी कार्यालयाने  ठरवून दिलेल्या  टक्केवारी  नुसारच  देण्यात यावे  व याची  कटाक्षाने  खातरजमा  तहसीलदार  यांनी त्यांच्या स्तरावर करुन घ्यावी. काही  कारणास्तव  एखाद्या किरकोळ  केरोसीन  परवानाधारकाच्या  कार्डच्या  संख्येमध्ये कमी – जास्त बदल झाला  असल्यास तात्काळ ती बाब निदर्शनास  आणून द्यावी.  एखाद्या परवानाधारकास त्याला जोडण्यात आलेल्या कार्डसंख्येपेक्षा  अनावश्यक कमी -जास्त नियतन देण्यात आल्यास  त्यास संबंधीत अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल. तहसीलदार यांच्यास्तरावरुन दरमहा तालुक्यातील  संबंधीत  गॅस  एजन्सीकडून एक गॅस  धारक, दोन गॅस धारक यांची यादी हस्तगत करुन गॅसधारकांच्या शिधापत्रीकेवर  स्टँपींग करुन शासन नियमानुसार कमी नियतन देण्यात यावे. जर गॅसधारकांच्या शिधापत्रीकेवर  स्टँपींग  न करता किरकोळ  केरोसीन  परवानाधारकास  कमी- जास्त नियतन  देण्यात आल्यास त्यास  सर्वस्वी  तहसीलदार यांना जबाबदार  धरण्यात  येईल. 
जिल्ह्याच्या संकेतस्थळावर केरोसीन वितरणाचे आदेश न चुकता टाकण्यात यावेत. पात्र शिधापत्रीकाधारकांना महिना भरात कधीही  दुकानात  केरोसीन निश्चीतणे मिळेल. या दृष्टीने  केरोसीन  परवानाधारकांना  कोटा उपलब्ध ठेवण्याबाबत  सूचना देण्यात  याव्यात . 
    सर्व तहसीलदार  यांनी केरोसीन विक्रेत्यांना उचल, वाटपावर  बारकाईने लक्ष ठेवून  गैरप्रकार, अनियमितता  होणार नाही  याची काळजी  घ्यावी . तसेच  या आदेशात  समाविष्ट  असलेल्या  प्रत्येक विक्रेत्याकडील ‍शिल्लक  साठा  दरमहा  28 तारखेपर्यंत न चुकता  जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. घाऊक, अर्धघाऊक केरोसीन विक्रेता यांना  वाटपासाठी किरकोळ, हॉकर्स, स्वस्त धान्य दुकाने संलग्न  केलेली  आहेत ते  कार्डधारकांना केरोसीनचे  वाटप  सुरळीतपणे करतात किंवा कसे याची खात्री करावी व संबंधीतांकडून  वाटपाबाबतचा अहवाल  घेण्यात यावा. त्याबाबतचा  अहवाल सादर करण्याचे आदेशही तहसीलदारांना देण्यात आले आहेत.
    कंपनी एजंटांनीही आदेश प्राप्त होताच तीन दिवसांच्या आत रक्कम अर्धघाऊक, किरकोळ  परवानाधारक  यांच्याकडून  जमा करुन  घेवून त्या विक्रेत्यांना केरोसीनवितरण करावे.  केरोसीन  कंपनी  एजंटांनी त्यांना देण्यात  आलेला कोटा  तालुकानिहाय  वाटप करीत असताना  वाटपासाठी  पाठविलेले  टँकर प्रथम तहसील  कार्यालयात हजर  करावे . टँकर ट्रॅकींग  सिस्टीमनुसार  तहसीलदार निर्देश  देतील त्याप्रमाणे  तहसील  कार्यालयाचे  प्रतिनिधी  समक्ष केरोसीनचे वाटप करावे. केरोसीन वितरणाची कार्यवाही  सायंकाळी 6 वाजेपर्यंत  करावी  असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. 
   सर्व केरोसीन कंपनी एजंट,अर्धघाऊक ,किरकोळ विक्रेत्यांनी त्यांना देण्यात  आलेल्या केरोसीन कोटा दिनांक 1 ते 10 तारखेपर्यंत  60 टक्के, दिनांक 11ते 17 तारखेपर्यंत 85 टक्के  व 18 ते 25 तारखेपर्यंत  100 टक्के नियतन  उचल करुन  वाटपाची  कार्यवाही पूर्ण करावी . कोटा  मुदतबाह्य  उचल  केली जाणार  नाही किंवा  व्यपगत  होणार नाही याची सर्व  संबंधीतांनी  दक्षता घ्यावी . सर्व केरोसीन  कंपनी  एजंटांनी  त्यांना दिलेला  केरोसीन  कोटा 25 तारखेपूर्वीच उचल  होईल  अशी व्यवस्था  करावी .  25 तारखेस  ‍किंवा त्यापूर्वी कोटा पूर्ण  उचल  झाला असल्यास  तसा स्वतंत्र अहवाल  या कार्यालयास सादर  करावा. तालुक्यात  देण्यात येत  असलेल्या नियतनाची  टक्केवारी पुढीलप्रमाणे  आहे-  उस्मानाबाद -100 टक्के, तुळजापूर- 100टक्के, उमरगा -100टक्के , लोहारा 100 टक्के, भुम 100 टक्के , परंडा 100 टक्के, कळंब 100 टक्के , वाशी 100 टक्के.            

 
Top