उस्मानाबाद -  सहायक आयुक्त राज्य निवडणूक आयोग यांनी दि. 16 व 17 ऑक्टोबर या दोन दिवशी तांत्रिक कारणामुळे नामनिर्देशनपत्र ऑनलाईन भरण्यास इच्छुक उमेदवारांना शक्य होत नसल्यास, अशा ग्रामपंचायतीच्या संदर्भात संबंधीत तहसिलदार तथा निवडणूक अधिकारी यांनी पारंपरीक पध्दतीने विहित वेळेत नामनिर्देशनपत्रे स्विकारण्याचे निर्देश संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना कळविले आहे, असे जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.            

 
Top