उस्मानाबाद - श्रीमती सटवाबाई शिक्षण संस्था देगलूर संचलित अपंग उद्योग केंद्रात विविध व्यवसायाचे प्रशिक्षण पुर्ण केलेल्या प्रौढ अस्थिव्यंग, मुकबधीर, अंध, मतीमंद बेरोजगार उमेदवारांनी नौकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अपंग उद्योग केंद्रात विविध व्यवसायातून विविध वस्तु उत्पादन करण्यात येत असून त्यातून सर्व अपंगांना हक्काचा रोजगार देण्याबरोबरच त्यांना स्वंयसिद्व बनविण्यासाठी संस्था प्रयत्न करीत आहे.
          अपंग उद्योग केंद्राच्या नौकरीसाठी प्रशिक्षीत अपंगाकडून अर्ज मगविण्यात येत आहेत. अपंगानी  अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेसह प्रशिक्षीत असल्याचे प्रमाण पत्र व कोणत्या उद्योगात आवड किंवा कोण्त्या तांत्रिक कौशल्य याबाबतची माहिती उद्योग केंद्राच्या पत्यावर संर्पक करून पत्रव्यवहार करावा अथवा समक्ष भेटावे.निवड झालेल्या अपंग उमेदवारांना निवास व भोजनाची व्यवस्था संस्थेतर्फे विनामुल्य करण्यात येणर आहे.इच्छुक पौढ सर्व प्रवर्गाच्या अपंग उमेदवारांनी दि. 30 ऑक्टोबर पर्यत,तुळजा भवानी अध्यापक विद्यालय परिसर रामपूर रोड देगलूर,ता. देगलूर जि.नांदेड या पत्त्यावर अर्ज करावेत किंवा समक्ष भेटावे असे आवाहन कर्मशाळा अधिक्षक तुळजाभवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, यांनी एका पत्रकान्वये केले आहे. 
 
Top