उस्मानाबाद - महाराष्ट्र स्वंयअर्थसहाय्यित शाळा ( स्थापना व विनियमन ) अधिनियम, 2012 व स्वयंअर्थसहाय्यित शाळा ( स्थापना विनियमन ) ( दुसरी सुधारणा ) 2013 अन्वये स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर शैक्षणीक वर्ष 2016-17 साठी सर्व माध्यमाच्या प्राथामिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक या नवीन शाळा व विद्यमान शाळांचा दर्जावाढ करण्यासाठी पात्र व इच्छुक संस्थाकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सदर अर्ज www. Selffinanceschool. Com या संकेतस्थळावर दि. 5 नोव्हेंबर पर्यत सायंकाळी 5-30 वाजेपर्यंत ऑनलाईन पध्दतीने सादर करावेत. सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्जासाठी ना-परतावा तपासणी शुल्क रुपये पांच हजार ऑनलाईन ई- पेमेंटद्वारे अदा करता येईल अथवा ऑनलाईन तयार झालेल्या चलनाद्वारे सदर शुल्क संबंधीत निवडलेल्या बँकेत जमा करता येईल. शुल्क जमा केलेल्या चलनाची प्रत व आवश्यक असलेली सर्व कागदप्रत अर्जासोबत संकेतस्थळावर अपलोड करावी. ऑनलाईन पध्दतीने अर्ज अपलोड केल्यानंतर उपरोक्त अर्ज व त्यासोबतच्या छायांकित प्रती साक्षांकीत करुन दि. 10 नोहेंबर 2015 सायंकाळी 5 वाजेपर्यंत नमुद केल्याप्रमाणे अर्जाशी संबंधीत जिल्हृयाच्या शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात प्रस्ताव जमा करावेत.असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद उस्मानाबाद यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.