नळदुर्ग :- स्वत:च्या उत्पन्नातून दुसर्‍याचे संसार उभे करणे आणि वंचितांना मदत करणे ही कृती सहिष्णुतेची असल्‍याचे मत पंडित कैलास (राजस्‍‍थान) यांनी व्‍यक्‍त केले.
तुळजापूर तालुक्यातील बाभळगाव येथील वैष्णोदेवी फुड प्रॉक्टस्डच्या वतीने अपंग, निराधार व मुकबधीर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोविंद काकाणी तर प्रमुख पाहुणे म्हणून राजकुमारी काकाणी, पंडित मेघराज, वैष्णोदेवी फुड्सचे मालक नवनीत काकाणी, निधी काकाणी, महाव्यवस्थापक विजय मुळे, उपव्यवस्थापक महेंद्र जाधव, आपलं घरचे व्‍यवस्‍थापक शिवाजी पोतदार आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक विजय मुळे, सूत्रसंचालन रामकृष्‍ण गायकवाड यांनी केले तर शिवाजी चव्हाण यांनी आभार मानले.
या कंपनीच्या वतीने नळदुर्ग येथील चैतन्य मुकबधीर विद्यालय, नूतन अपंग विद्यालय, आपलंघर या संस्थांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. 
 
Top