पांगरी (गणेश गोडसे) :- ग्रामीण भागातील आर्थिक द्रुस्टया आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाराला उभारणी देण्याच्या उद्दात्त हेतूने पांगरी येथील प्रोडूसर मृदगंध अॅग्रो प्रोडूसर कंपनीच्या वतीने परिसरातील सभासद शेतकर्यांना महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाअंतर्गत (एमएसिपी) हरभरा पीक प्रात्याक्षिक 2015-16 साठी दहा टक्के लोकवाट्यातून त्यासाठी लागणारे विविध साहित्य मोफत वाटप करण्यात आले.
प्रात्याक्षिक कार्यक्रमाअंतर्गत प्रती सभासद शेतकर्यांस 20 किलो हरभरा बियाणे,50 किलोची एक डि.ए.पी.ची ब्याग ,याबरोबरच बियानांवर प्रक्रिया करण्यासाठी विविध औषधे,फवारणीसाठी विविध कीटकणाशके आदी साहित्य वाटप करण्यात आले.मृदगंध अॅग्रो प्रोडूसर कंपनीच्या माध्यमातून या पिकाच्या प्रात्याक्षिकासाठी (एटिएमए)आत्मा सोलापूर यांच्या अधिकार्यांचे सहकार्य लाभले.भविष्यातही शेतकर्यांसाठी कंपनीमार्फत विविध विकासात्मक योजना राबवल्या जातील असे अधिकार्यांनी सांगितले.
बियाणे वाटप कार्यक्रम प्रसंगी कंपनीचे अध्यक्ष सतीश जाधव,सचिव रामलिंग सुरवसे,संचालक गणेश गोडसे,बाबा शिंदे,लक्ष्मण बनसोडे,पदमाकर बाभळे,भाऊसाहेब घावटे,चंद्र्कांत पाटील,प्रशांत उकिरडे यांच्यासह पांगरी परिसरातील विविध गावातील सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.