उस्मानाबाद - शारदीय नवरात्र महोत्सवाच्या प्रारंभापासून नगर पालिका प्रशासनाकडून नियोजनात्मक आराखडयानुसार जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थान अध्यक्ष डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर पालिका प्रशासनाने चोख व्यवस्थापन केले आहे. नवरात्र महोत्सवात भाविकांनी मोठी गर्दी होणार असल्याने भाविकांच्या सेवेसाठी न.प.कर्मचारी रात्रंदिवस तीन पाळीमध्ये सेवा करत आहेत. नगर पालिकेच्या अध्यक्षा जयश्री कंदले, मुख्याधिकारी राजीव बुबणे, नगर अभियंता एम.आर.फारुकी, ए.व्ही.सरकने, प्रशांत चव्हाण, स्वच्छता निरीक्षक एम.आय.शेख,यात्रा प्रमुख एम.आर.सोनार यांच्यासह कर्मचारी हे स्वत: दक्ष राहून सर्व कामकाजावर लक्ष ठेवून आहेत.
नगर पालिकेने या यात्रा महोत्सव काळात विविध कामांचे नियोजन केले असून सफाई विभागात-8 टॅक्ट्रर, 1 टिप्पर, टॅक्टर(ले)-2,टमटम-5,सफाई मजूर (स्थाई)-30 व ठेका यांच्याकडील 115 मजूर, इतर नगर पालिकांचे 22 कर्मचारी कार्यरत आहेत. लातूर रोड,वेताळ ते बारालिंग रोड, उस्मानाबाद रोड, घाटशीळ रोड पार्कींग,मोबाईल टॉलेट-10,फॉगींग मशीन -4,मंदीर मागील आराधवाडी भागातील 70 ते 80 ट्रिप कचरा उचलण्यात आला असून आवश्यतेनुसार जंतुनाशके शहरात विविध ठिकाणी वापरण्यात येत आहेत. शहरातील मोकाट जनावरे पकडून कोंडवाडयाची सोडण्याची सोय करण्यात आली आहे. नगर पालिकांकडून भवानी मंदिर परिसर,भवानी मंदिर समोर, पावणारा गणपती, घाटशीळ रोड पार्कींग, आंबेडकर चौक, शिवाजी चौक, जुन बसस्थानक, नविन बसस्थानक( लातूर रोड) आणि बाबजी अड्डा येथे प्रथमोपचार केंद्रे निश्चित करण्यात आली आहे.
नगर पालिकेकडून यात्रेकरु भाविकांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून शहरात दररोज पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तसेच विविध ठिकाणी पाणपोईची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शहरातील विविध कुंड, विहीरी इत्यादी पाणीसाठे ब्लिचींग पावडरचा योग्य मात्रा निर्जतुकीकरण केले आहे. शहरातील हॉटेल व्यवसायीकाचे नमुने पाणी तपासणी सोय केली आहे. पाणपोई व प्रशासकीय यंत्रणेकरीता पाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.
उस्मानाबाद रोड हायवे रोडवरील पथदिवे संपूर्ण दुरुस्त करुन चालू करण्यात आले आहे. यात्रा कालावधीत मध्ये शहरामध्ये आवश्यक ठिकाणी हॅलोजन लावून विद्यूत व्यवस्था करण्यात आली आहे. भवानी मंदिर समोर, घाटशीळ रोड पार्कींग, आराधवाडी व पोलीस स्टेशन या ठिकाणी अग्निशमन विभागाकडून 4 वाहनांची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. तसेच प्राधिकरणाकडून दीपक चौक ते आंबेडकर चौक, शिवाजी चौक आदि ठिकाणची अतिक्रमण काढले आहेत. महाद्वार रोड ते कामनवेस पॅच वर्क चे काम पूर्ण केले आहे. तसेच अग्रवाल बिल्डींग ते आर्य चौक पॅच वर्क चे काम पूर्ण झाले आहे.
शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आली आहेत. तसेच शहरातील प्रमुख ठिकाणी बॅराकेटींग,स्वागत कमानी लावण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शहरात भाविकांना त्रास होणार नाही, याची दक्षता नगरपालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेली आहे.