
दिवाळी म्हणजे पावित्र्याचा सण, आनंदाचा सण. हा सण आपल्यातला उत्साह द्विगुणित करतो. या दिव्यांच्या झगमगाटात हा बहारदार अंक आम्ही प्रकाशित करीत आहोत. या अंकात दर्जेदार कथा, कविता, महिला जगत, कृषी व ग्रामीण जीवनाशी संबंधित वैचारिक लेखन शिवाय शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, व्यंगचित्र आदी साहित्यांची जणू मांदियाळीच ठरणारा असा हा दिवाळी अंक वाचकांच्या भेटीस येत आहे. महाराष्ट्राच्या वैभवशाली साहित्य परंपरेत भर टाकणारा हा ‘दिपरंग’ दिवाळी विशेषांक तमाम वाचकांतून स्वागतार्ह ठरेल, याचा आम्हास विश्वास वाटतो.
संपादक
शिवाजी नाईक
मो.९६५७६८४३७०,
Emai : livetuljapur@gmail.com