पांगरी (गणेश गोडसे ) ग्रांमपंचायतीच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सोलापूर जिल्ह्यातील संवेदनशील व अतिसंवेदनशील गावांची नावे जाहीर केली असून या गावात निवडणूक काळात पोलीसाबरोबरच इतर सुरक्षा दल तैनात करणार येणार असून निवडणूक जाहीर झालेल्या 45 गांवापैकी अठरापेक्षा जास्त गावे ही अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.
          तालुक्यात होऊ घातलेल्या 93 ग्रामपंचायतीपैकी बार्शी तालुक्यात सर्वाधिक संवेदनशील गावे ठरली आहेत.यामुळे बार्शी तालुक्यातील जंनतेमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.शांत बार्शी अशी ओळख असलेल्या बार्शी तालुक्याची जाहीर झालेल्या नावानुसार अशांत बार्शी म्हणून नवीन ओळख महाराष्ट्राला होऊ पहात आहे.नाव कमावण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागतो मात्र नाव घालवण्यासाठी जास्त काळ लागत नाही हे सर्वश्रुत असतांनाही याचा कोणी विचार करत नाही ही शोकांतिका आहे.
  पोलिस खात्याने सोलापूर जिल्ह्यातील संवेदनशील  गावांची नावे जाहीर केली असून त्यात बार्शी तालुक्यातील पोलिस ठाणे असलेल्या पांगरी या गावासह आगळगाव,नारी,कांदलगाव,कोरेगाव,पिंपळगाव(दे), बावी,कुसळंब,खामगाव,पिंपळगांव धस,खडकोणी,कळंबवाडी,महागांव,मळेगांव,बाभळगांव ही  संवेदनशील गावाच्या यादीत आली आहेत.या आकडेवारीवरुण गावे व बार्शी तालुका कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे याचा अंदाज येऊ शकतो.मात्र या गोष्टीचा विचार करण्यास कोणाला वेळ आहे.पिढ्यामागुण पिढ्या दिशाहीन होत असताना याकडे समाजधुरीनाचे दुर्लक्ष होत आहे का त्याकडे कानाडोळा केला जात आहे हा संशोधनाचा विषय होत चालला आहे.सध्या खूप काही घडतय,मात्र समाज ते उघड्या डोळ्यांनी पहान्यापालीकडे काहीही करत नाही.उलट चालू प्रकाराला मुकसंमती देऊन मोकळे होतो आहे.आपले आणि घडत असलेल्या दुर्दैवी घटनाचे काही देणे घेणे,सोयर-सूतक नसल्याच्या आविर्भावात सगळे वागताना दिसत आहेत.मात्र यातून पुढे भविष्यात काय दूरगामी परिणाम होणार आहेत याचा साधा विचारही कोण करताना दिसत नाही.सगळे मस्तवालपणे आपल्याच मस्तीत गुंग होऊन चालत आहेत.
होऊ घातलेली ग्रामपंचायतीची निवडणूक शांततेत व निर्भीड वातावरणात पार पडावी यासाठी पोलिस यंत्रणेचेही शर्थीचे प्रयत्न सुर आहेत.शांततेस बाधा पोचवणारे,समाजात दहशत माजवून गुंडगिरी करण्याची प्रवृती असणार्‍याना निवडणूक कालावधीसाठी हद्दपार करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.पांगरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 300 समाजकंटकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून अनेकांना  तडीपारीचे आदेश बजावण्यात आले आहेत.होत असलेली निवडणूक खूपच विचित्र होणार,असा भास निर्माण करण्यात आला होता.मात्र निवडणुका अजूनतरी शांततेत पार पडत असल्यामुळे जनमानसातून समाधान व्यक्त केले जात असून उर्वरित कालावधीही असाच शांततेत पार पडावा अशी प्रार्थना होत आहेत.निवडणुकीचा जोर आणि घरात आई-बापांच्या जीवाला घोर अशीच परिस्थिती आहे.प्रचारासाठी घरातून बाहेर गेलेला मुलगा घरात येईस्तोर घरच्यांच्या जीवात जीव रहात नाही.

 
Top