उस्मानाबाद-  सकल जैन समाजाचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे गव्‍हर्नर कॉन्सलिंग मेंबर   शितल वसंतराव मेहता यांचे शनिवारी रोजी सकाळी  हदय विकाराने निधन झाले. मृत्यु समयी त्यांचे वय ५९ वर्ष होते. त्यांच्या पश्चात्य पत्नी, भाऊ, एक मुलगा, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
    शितल मेहता हे कुशल संघटक व मनमिळावू असल्यामुळे सर्वच स्तरातील लोकांना ते परिचित होते. उस्मानाबाद रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष शितल मेहता असून एक गाव-एक गणपतीचे जनक होते. त्यानंतर ही योजना संबंध राज्यात राबविण्यात आली. मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष, उस्मानाबाद नगर वाचनालयाचे संचालक, भारतीय जैन संघटनेचे विभागीय सदस्य, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मल्टीस्टेटचे संचालक पदावर शितल मेहता काम पाहता होते. 
 
Top