पांगरी (गणेश गोडसे) ग्रामपंचायत निवडनुकीच्या दुस.या टप्यात पांगरी ता.बार्शी पोलिस ठाण्याच्या हदीतील निवडणुक जाहीर झालेल्या 45 गांवापैकी दहा गावे बिनविरोध झाल्यामुळे 35 गांवांत निवडणुकीची प्रक्रिया पार पडली.
ग्रामपंचायतीसाठी किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता शांततेत मतदान प्रकिया पार पडली.पांगरी येथे आज अतिशय चुरशीने मतदान प्रकिया पार पडुन पांगरीत प्रथमच 78 टक्के मतदानाची नोंद झाली.पांगरीतील सात बुथ केंद्रातुन 78 टक्के मतदान झाले.पाच हजार 78 मतदारांपैकी 3933 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
पांगरी शेजारील कारी येथे 86 टक्के मतदान झाले.4001 मतदारांपैकी 4338 मतदारांनी घोळवेवाडी येथे 77 टक्के मतदान झाले.875 पैकी 877 मतदारांनी मतदान केले.पांढरी येथे 80 टक्के मतदान झाले.637 पैकी 508 मतदारांनी मतदान केले.गोरमाळे येथे 88 टक्के मतदान झाले.1560 पैकी 1375 मतदारांनी मतदान केले.झानपुर येथे 83 टक्के मतदान झाले.305 पैकी 252 मतदारांनी मतदान केले.ममदापुर येथे 90 टक्के मतदान झाले.855 पैकी 768 मतदारांनी मतदान केले.धानोरे येथे 91 टक्के मतदान झाले.822 पैकी 745 मतदारांनी मतदानाचा हक्क बजवला.सकाळी सुरूवातीला पांगरी भागात मतदानाचा वेग मंदच होता.दुपारनंतर मतदानाचा वेग वाढला.लोकसभा निवडणुकीच्या र्इतिहासात पांगरी सारख्या संवदनशिल गावात प्रथमच कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रकिया शांततेत पार पडली.
पांगरी पोलिस ठाण्याच्या हदीतील 35 गांवांमधील 40 र्इमारतीमधुन व 112 बुथमधुन ही मतदानाची प्रकिया पार पडली. ऊपविभागीय पोलिस अधिका.यांसह पांगरीचे प्रभारी अधिका.यांसह चार पोलिस अधिकारी उपनिरीक्षक 51 पोलिस कर्मचारी व 70 गृहरक्षक दलाच्या जवानांनी शांततेत मतदान प्रकिया पार पाडन्यासाठी परिश्र्रम घेतले.
चौकटः पांगरी पोलिस ठाण्याच्या हदीतील खडकोणी येथे मतदान प्र्रिकयेदरम्यान दोन गटात भांडणे होऊन मतदान यंत्र फोडल्याची चर्चा आहे.याबबत पांगरी पोलसात उशिरा पर्यन्त कोणताही गुन्हा नोंद नव्हता.