पांगरी -: गणेश गोडसे व सागर गोडसे यांच्या वाढदिवसानिमित्त मुक्या प्राण्यांच्या अंगातील सुप्त कलागुणांना चालना देण्यासाठी जय भवानी मित्र मंडळ पांगरी (ता.बार्शी) यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या घोड्यांच्या नृत्य व सौदर्य स्पर्धेस राज्यभरातून भरघोष प्रतिसाद मिळाला. वाफळे ता.मोहोळ येथील मचिन्द्र माळी यांचा घोडा या स्पर्धेत प्रथम विजेता ठरला. स्पर्धेचे उद्घाटन पांगरीचे सरपंच विजय गोडसे यांच्या हस्ते व पांगरी पोलिस ठाण्याचे राजू राठोड,पं.स.माजी सभापती विजय गरड,माजी सरपंच औदुंबर काकडे,स्वप्नील काळे,बाळासाहेब मोरे,डॉ.अरिफ शेख,सागर गोडसे,डॉ.सुधीर शिंदे,धनंजय तौर,माणिक शिंदे,संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष आनंद काशिद,अ.भा.मराठा सेवा संघाचे अमोल नवले,शहाजी धस,बाबा जाधव राजाभाऊ पाटील,पत्रकार गणेश गोडसे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेसाठी विजय गोडसे व स्वप्नील काळे यांच्यातर्फे ठेवण्यात आलेले प्रथम 7001 रुपयांचे बक्षीस वाफळे येथील माचिन्द्र माळी यांच्या धण्याने पटकावले,बाळासाहेब मोरे यांच्यावतीने ठेवण्यात द्वितीय 5001 रु बक्षीस सातार्याच्या नितिन जाधव यांच्या घोड्याने मिळवले,रामभाऊ लाडे यांच्यावतीने ठेवण्यात आलेले तृतीय 3001 रुपये बक्षीस वाखरी (ता.पंढरपूर) येथील संतोष पवार यांच्या घोड्यास देण्यात आले.धनंजय तौर व अजित वासकर यांच्यावतीने ठेवण्यात आलेले चौथ्या क्रमांकाचे 2001 रु.बक्षीस शिरसाव (ता.परांडा) येथील संजय जाधव यांच्या घोड्यास तर राहुल वासकर यांनी ठेवलेले पाचव्या क्रमांकाचे बक्षीस पुरी (ता.बार्शी) येथील समाधान झालटे यांच्या घोड्यास देण्यात आले.
कार्यक्रम स्थळी निकाल घोषित करून मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दादा गोडसे,विलास गोडसे,अनिल गरड,सागर गोडसे,राहुल गोडसे,अजित वासकर,अजित गोडसे,विश्वास काकडे,संदीप नाईकवाडी,गणेश गोडसे,निलकंठ कदम,आकाश सरडे,लखण नाईकवाडी,उमेश गाढवे यांच्यासह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.