पांगरी (गणेश गोडसे) :- खडकोणी ता.बार्शी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जय मल्हार ग्रामविकास आघाडीचे सचिन रामलिंग नलावडे यांची तर उपसरपंच पदीही त्याच आघाडीच्या सौ.राणी सचिन बगाडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
नुकत्याच्या झालेल्या ग्रांमपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत जय मल्हार ग्रामविकास आघाडीने सात पैकी पाच जागा जिकून ग्रांमपंचायत आपल्या ताब्यात घेतली होती.सर्वसाधारण गटातील पुरुष प्रवर्गासाठी खुल्या असलेल्या सरपंच पदासाठी उच्चशिक्षित(एम.बि.ए) सचिन नलावडे यांचा व उपसरपंच पदासाठीही सौ.राणी बगाडे यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी बिनविरोध निवडणूक पार पडल्याचे जाहीर केले.
यावेळी आश्विनी अशोक नलावडे, पूजा सुहास कोथमिरे,विक्रम मल्हारी जाधवर हे सदस्य हजर होते.संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या व मतदान यंत्र फोडल्यामुळे खडकोणी ग्रांमपंचायत निवडणुक चर्चेत होती॰येथे हायटेक प्रचार यंत्रणा,सभा,वचननामे आदीमुळे संपूर्ण बार्शी तालुक्याचे लक्ष लागले होते.
    बाळासाहेब बगाडे, पंढरी बगाडे, अशोक नलावडे, कल्याण नलावडे, अमित बगाडे, माधव नलावडे, गौतम नलावडे, बाबूशा नलावडे, दयानंद नलावडे, संजय बगाडे, मल्हारी जाधवर, श्रीकांत आगाव, दिलीप शिंदे, महादेव नलावडे, शहाजी बगाडे, डॉ.अभय नलावडे, डॉ.अनंत आगाव, भास्कर नलावडे, संतोष नलावडे, देवीदास नलावडे, बुवासाहेब आगाव, संदीप नलावडे, बाबा आगाव आदी उपस्थित होते.निवडीनंतर कार्यकर्त्यांनी कसल्याही प्रकारचा गाजा वाजा न करता अथवा फटाके न वाजवता फक्त एकमेकांना गुलाल लावून विजयोत्स्व अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला.
 
Top