पांगरी (गणेश गोडसे) :- पांगरी ता.बार्शी ग्रामपंचायतीची पहिली विशेष सभा शनिवार दि.21 रोजी विविध विषयांना मंजूरी देत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. विशेष सभेच्या अध्यक्षस्थाणी नूतन सरपंच युन्नुस बागवान हे होते.
या सभेत संपूर्ण पांगरीत गावात ग्रामस्व्छता अभियान राबवणे,महिलांसाठी ठिकठिकाणी सुलभ शौचालयाची निर्मिती करणे,पांगरीत होत असलेले अन्यायकारक व अतिरिक्त भारनियमन कमी करणे,सिंगल फेजिंगच्या कामातील अडचणी दुर करून गावात सिंगल फेजिंगची योजना कार्यान्वित करण्यास विज वितरण कंपनीस भाग पाडणे,पांगरी पंचक्रोशतील रुग्णांच्या सोयीसाठी असलेल्या व सध्या शोभेचे बाहुले बनलेल्या पांगरी ग्रामीण रुग्णालयातील रिक्त जागा तात्काळ भरण्याबाबत पाठपुरावा करून तो प्रश्न निकाली काढणे,विविध ग्राम समित्यांचे पुंनर्गठण करणे आदि ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. यावेळी सरपंच युन्नुस बागवान उपसरपंच रामभाऊ गाढवे ज्योती पोफळे,सुवर्णा बगाडे,गुणवंत गोडसे,रूपाली नारकर,गणेश जाधव,अंकुश लाडे,सुनंदा जाधव,विशाखा गायकवाड,महानंदा म्हसे,दिलीप जानराव,विश्वास देशमुख,रेश्मा कोतवाल,शुभांगी कुंभार यांच्यासह पंधरा सदस्य उपस्थित होते.ग्रामविकास अधिकारी वैभव माळकर,वरिष्ठ लिपिक मारुती म्हसे आदी यावेळी उपस्थित होते.