उस्मानाबाद :- सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने बांधण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन या प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते गुरुवार, दि. 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत हे अध्यक्षस्थानी राहणार असून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरातील या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यास जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारीही उपस्थित राहणार असल्याचे समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त रवींद्र कदम आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बी.एम. थोरात यांनी कळविले आहे.