पांगरी (गणेश गोडसे) :- पांगरी पोलिस हद्दीत पुणे-लातूर राज्य मार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांच्या बसच्या वेगवेगळ्या झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.जखमीवर बार्शीच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पहिली घटना घारी ता.बार्शी येथील बसस्थानाकावर घडली.मारुती गोपीनाथ कातकडे वय 36 रा.ता.गंगाखेड,जि.परभणी यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,ते त्यांच्या ताब्यातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळांची एम.एच.20.बि.एल.2976 ही बस नालासोपाराहुन बार्शी-पांगरी मार्गे लातूरकडे जात असताना समोरून बार्शीकडे जाणार्‍या दुचाकी क्रमांक एम.एच.13 ए.एफ.272 या दुचाकीची एकमेकास धडक बसली.त्यात शिवाजी मनमथ होणराव वय 45 व निशा मनमथ होणराव वय 47 अशी अपघातात जखमी झालेल्या पती-पत्नीची नांवे आहेत.
  दुसर्‍या घटनेत शिदेश्वर हरिश्चंद्र जाधवर वय 32 रा.धोत्रे ता.बार्शी यांनी फिर्याद दिली आहे.त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,ते त्यांच्या दुचाकी क्रमांक एम.एच.42.ई.3380 या दुचाकीवरून जात असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या एम.एच.20 बि.एल.3165 ह्या एस.टी.बसच्या चालकाने त्याच्या ताब्यातील बस भरधाव वेगात चालवून दुचाकीस पाठीमागून जोरची धडक दिली.त्यात दुचाकीचे दहा हजाराचे नुकसान झाले आहे.अपघातांनंतर बस चालक फरार झाला आहे.हयगायीने व अविचाराने बस चालवून अपघात करून जखमी करण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी बस चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.

 
Top