पांगरी (गणेश गोडसे) :- पाठीवर कौतुकाची थाप टाकून समाजसेवेचे बळ देण्यासाठीच आम्ही घरोघरी व गावोगावी जावून सत्कारर्मूर्तीचा सन्मान करतो तसेच तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन बार्शी तालुका विकास मंचचे अध्यक्ष विक्रम सावळे यांनी केले.ते पांगरी ता.बार्शी येथे नूतन सरपंच,उपसरपंच व विविध क्षेत्रातील नामांकित लोकांच्या सत्कार समारंभ कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
सावळे पुढे बोलताना म्हणाले की समाजासाठी करण्यासाठी खूप कांही आहे.ग्रामीण भागातील अनेकजण आपल्या कर्तुत्वाने पुढे गेलेले आहेत.सरपंच युन्नुस बागवान,उपसरपंच रामा गाढवे,पत्रकार गणेश गोडसे यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी विकास मंचाचे उपाध्यक्ष गंगा आहिरे,महारुद्र जाधव,संजय हिंगमिरे,पि.एस.स्वामी,अरुण नारकर,सुनील मेंडके,मोरे मेजर,शकिल बागवान,सुखदेव नारायनकर,धनंजय तौर,अजित पोफळे,भीमराव कांबळे,ईसुब कोतवाल,मंजूर शेख,सादिक पठाण,मोती बागवान आदि उपस्थित होते.आभार महारुद्र जाधव यांनी तर सूत्रसंचालन नागेश गाभणे यांनी केले.
 
Top