मंगळवेढा (समाधान फुगारे) :- मंगळवेढा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सालार चाऊस यांनी शहरातील व तालुक्यातील गणेश उत्सव, नवरात्र महोत्सव, ग्रामपंचायत निवडणुका चांगल्या प्रकारे पार पडल्यामुळे जयमल्हार क्रीडा मंडळाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.
      मंगळवेढा तालुक्यात गेल्या ३० वर्षापासून जयमल्हार क्रीडा व सामाजिक आणि संस्कृतिक विषयक काम करत असून तालुक्यात निरनिराळ्या क्षेत्रात काम करणार्‍या युवकासह प्रशासनात कामकरणार्‍या अधिकार्‍यांचेही कौतुक व विशेष कार्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात येतो.
       पोलिस निरीक्षक सालार चाऊस यांनी मंगळवेढा पोलिस स्टेशनचा पदभार स्वीकारल्या पासून त्यांनी आपल्या कामाचा एक वेगळा ठसा उमठावला आहे. गणपती उत्सव नवरात्र महोत्सव, ग्रामपंचायत निवडणुका,दीपावली सन अशा वेगवेगळ्या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त देवून त्यांनी जनतेला एक वेगळ्या प्रकारे दिलासा दिला आहे.
         आठवडा बाजार गर्दी पासून ते मंडळाच्या ठिकाणी चालणारे जुगार,मटका,गुटखा आदि गोष्टींवर त्यांनी वचक ठेवला आहे. शहरातील वाहतूक नियंत्रण असो अथवा गावागावातील भांडणे तंटे मिटवून वेगळा ठसा त्यांनी निर्माण केला आहे. 
       यावेळी भीमराव मोरे, शिवाजी पवार, मारुती वाकडे, सुजीत कदम, जयराम आलदर, बलवान वाकडे आदि नागरिकांनी पोलिस निरीक्षक सालार चाऊस यांचा सत्कार करण्यात आला.

 
Top