उस्मानाबाद :- जिल्हा उद्योग केंद्र, उस्मानाबाद पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योगजकाता विकास केंद्र, आयोजित सर्वसाधारण घटक योजनेतील सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवती व महिलांसाठी मोफत अन्नधान्य व फळ प्रक्रियेवर आधारित उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम, परंडा येथे  24 नोव्हेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीमध्ये आयोजित केला आहे.
            या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये संपुर्ण अन्नधान्य व फळ प्रक्रियेवर आधारित उद्योगसंधी, टमाटा सॉस, जाम जेली, केचप, ज्युसचे विविध प्रकार, मसाले प्रक्रिया उद्योगसंधी, सोया प्रक्रिया, आवळा प्रक्रिया, लोणचे, मंचुरियन, व्हेज, विविध प्रकार, पिझ्झाचे विविध प्रकार, इटालियन पास्ता व स्पॅगेटीचे विविध प्रकार, सुप व  विविध प्रकार, प्रात्यक्षिके व थेअरी मार्गदर्शन, खरेदी विक्री यांचे तंत्र, उद्योजकीय व्यक्तीमत्व विकास, विविध महामंडळ कर्ज व अनुदान विषयी योजनांची माहिती, दाळ प्रक्रिया,पापड प्रक्रिया, उद्योगसंधी,प्रकल्प अहवाल विक्री कौशल्य उद्योग नोंदणी,प्रकल्प भेटी, कर्ज प्रस्ताव दाखल करण्याविषयी माहिती, अन्न भेसळ व औषधी संबंधी कार्यालयाची माहिती, उद्योगाला लागणारे परवाने, लोगो परवाना, आयएसआय ट्रेड मार्क संबंधी माहिती, एमआयडीसीमधील भुखंड, एसएसआय रजिस्ट्रेशन बँक संबंधी माहिती, सुक्ष्म, लघू व माध्यम मंत्रालय भारत सरकार यांच्या योजना, जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योगाच्या विविध योजना, यशस्वी उद्योजक व तज्ञ मार्गदर्शन व अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.
        तरी इच्छूक युवती व महिलांनी प्रवेश अर्ज भरण्यासाठी व अधिक माहितीसाठी 23 नोव्हेंबर पर्यंत संपर्क साधावा. तसेच त्या रोजी प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. अधिक माहिती व अर्जासाठी कार्यक्रम समन्वयक किशोर कांबळे  मो.9881558846/ 7385709435 यांच्याशी पंचायत समिती, परंडा येथे संपर्क साधावा असे आवाहन पांडुरंग कांबळे, क. प्रकल्प अधिकारी, एम.सी.ई.डी. उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top