उस्‍मानाबाद  -: वडगाव सि. (ता.जि. उस्‍मानाबाद) येथील जेष्ठ नागरीक महादेव सदाशिवराव कपाळे (महाराज) यांचे येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू असताना दुखःद निधन झाले. मृत्यूसमयी त्याचे वय ८७ वर्ष होते. 
वडगाव सि. येथील जेष्ठ नागरीक महादेव सदाशिवप्पा कपाळे यांचे उस्‍मानाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार चालू असताना निधन झाले. महादेव कपाळे  यांना या भागात महाराज या नावाने ओळखले जाते. तालुक्यातील अनेक गावात त्यांचा शिष्यवर्ग आहे. त्यांच्या पार्थिवावर वडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक विवाहीत मुलगी, नातू, पणतू असा परिवार असून त्यांच्या निधनामुळे वडगाववर शोककळा पसरली आहे.
 
Top