पांगरी (गणेश गोडसे) :- झानपुर ता.बार्शी येथील ग्रांमपंचायतीच्या सरपंचपदी राम-रहीम पॅनलचे संदीप भागवत चव्हाण यांची तर उपसरपंच पदीही राम-रहीम पॅनलचेच बिसमिल्ला अब्दुल पठाण यमची बिनविरोध निवड झाली.यावेळी जमील पठाण,शारूबी पठाण,सुमन चव्हाण,हाजु सय्य्द हे नूतन ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.सरपंच,उप-सरपंच पदासाठी प्रत्येकी एकाच अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकार्यांनी बिनविरोध निवड जाहीर केली.
यावेळी पॅनल प्रमुख रामलिंग सुरवसे, फारूख पठाण, ईसुब पठाण, अरुण चव्हाण, विकास आंबेकर, बनेश्वर आंबेकर, सर्जेराव चव्हाण, लक्ष्मण चव्हाण, संजय रायभान, अकबर मुलाणी, मुरलीधर चव्हाण, समीर पटेल आदी कार्यकर्ते उपस्थित होते. निवडिनंतर कार्यकर्त्यांनी गुलाल न उधळता अथवा फटाक्यांची आतषबाजी न करता साध्या पद्धतीने आनंदोत्सव साजरा केला.