पांगरी (गणेश गोडसे) :- घोळवेवाडी ता.बार्शी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजप प्रणीत गोपीनाथ मुंढे आशीर्वाद पॅनलच्या आशा दराडे यांची तर उपसरपंच पदीही आशीर्वाद पॅनलचेच श्रीमंत घोळवे यांची बिनविरोध निवड झाली आहे.सरपंच व उपसरपंच पदासाठी प्रत्येकी एकाच अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी श्री.भोसले यांनी निवडी बिनविरोध जाहीर केल्या.निवडीवेळी आशा दराडे,श्रीमंत घोळवे,सुनीता घोळवे,सुमन घोळवे,देवदत्त तोगे, रामकिशन घोळवे,त्रिशाला खाडे हे नूतन सातही ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक शरद पवार उपस्थतीत होते.
यावेळी पॅनलप्रमुख अजय दराडे,नामदेव घोळवे,हनुमंत खाडे,वसंत घोळवे,किरण खाडे,राजाभाऊ घोळवे,दिलीप घोळवे,अमोल घोळवे,दीपक खाडे,नामदेव खाडे,अरुण दराडे,रामरेश्वर घोळवे,मोहन घोळवे,कृष्णा घोळवे,बालाजी घोळवे आदी उपस्थित होते.निवडिंनंतर आशीर्वाद पॅनलच्या कार्यक्रत्यांनी गुलालची उधळण करून व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.