तुळजापूर :- राज्याचे गृहनिर्माण, खनिकर्म व कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी मंगळवार रोजी तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर मंदीर संस्थानच्या वतीने उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण यांनी त्यांना श्री तुळजाभवानी मातेची प्रतिमा, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी दिलीप हजारे, अनिल काळे, स्वीय सहायक रवि सांगळे, तहसीलदार काशीनाथ पाटील, मंदिर संस्थानचे व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांच्यासह पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.
यावेळी मंदीर संस्थानच्या कार्यालयात जिल्हा पत्रकारांनी दिलेल्या गृहनिर्माण संस्थेच्या प्रस्तावाच्या निवेदनास गृहनिर्माण मंत्री श्री.मेहता यांनी विचारविनिमय करुन तात्काळ मंजूरी दिली व आवश्यक त्या कार्यवाहीस्तव प्रस्तावातील बाबींविषयी संबंधितांनी योग्य ते निर्देश दिले. तसेच चर्चाअंती ते म्हणाले की, शासनाच्या वतीने ग्रामीण भागापर्यंत म्हाडाची योजना पोहचविण्याचे शासनाचे धोरण असल्याचेही त्यांनी नमूद केले.