मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 31 ऑक्टोबर,2014 रोजी पदाची सुत्रे स्विकारली. या नव्या शासनास नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. जनतेच्या प्रती असणारं उत्तरदायित्व विविध निर्णयातून या शासनानं दाखवून दिले आहे. महसूल, क्रीडा, सामाजिक न्याय, आरोग्य, परिवहन यासह सर्वच विभागांनी जनतेप्रती असणारी बांधीलकी त्यांच्या निर्णयातून दाखवून दिली. एक वर्षाच्या कालावधीत राज्य शासनाने केलेल्या या वचनपूर्तीचाच हा लेखाजोखा...
जलयुक्त शिवार अभियान : 
· 2019 पर्यंत महाराष्ट्राच्या दुष्काळमुक्तीचे उदिष्ट
· शेतकऱ्यांना 2 रुपयांत तांदूळ. आरोग्य सेवा शिक्षणात सवलत
· 1 कोटीवर शेतकऱ्यांना 8 हजार 582 कोटींची मदत
· भरपाईसाठी 50 टक्के ऐवजी 33 टक्के नुकसानीची अट
· 6 हजारावर गावांमध्ये जलयुक्त शिवारची 1 कोटी 20 लाख कामे
· कर्जाची फेररचना व्याज भरतंय सरकार   
रोजगार निर्मिती :
· दीड लाखांवर नवे रोजगार, समृध्दीचे नवे पर्व
· नव्या आयटी धोरणाची घोषणा; 50 हजार रोजगार
· औरंगाबाद-शेंद्रा बिडकिन मेगा औद्योगिक पार्क
· फार्म टू फॅशन ; अमरावती येथे टेक्सटाईल्स पार्क
· राज्यात विक्रमी 66 हजार कोटींची नवी गुंतवणूक 
· मेक इन महाराष्ट्र ;  जाचक परवानग्यांची संख्या कमी 
गतिमान सरकार
· कामात गतिमानता भ्रष्टाचाराला आळा
· पायाभूत सुविधा भक्कम ; मुख्यमंत्री वॉर रुम
· सेवा हमी लागु  , 224 सेवा अधिसूचित, 46 सेवा ऑनलाईन
· पाऊल प्रगतीचे ;  नवा महाराष्ट्र घडविण्याचे
· भ्रष्टाचाराच्या 949 प्रकरणांत खटल्यांना मंजूरी
· आपले सरकार ;  नागरिक-शासनामध्ये सुसंवाद 
· स्वच्छ कारभार, गतिमान सरकार : सेवाहमी-246 सेवा अधिूचित,46 सेवा ऑनलाईन. सेवेत कसून करणाऱ्यांना 5 हजार रुपयांपर्यंत दंड. 3 लाखांहून अधिक रक्कमेच्या कामांसाठी ई-टेंडर.आपले सरकार: नागरिक-शासन सुसंवाद.मुख्यमंत्री वॉर रुप 27 प्रकल्पांवर देखरेख.


कुंभमेळयाचे नियोजन..
· महाराष्ट्राच्या व्यवस्थापन कौशल्याची दखल
· सुरक्षेची संपूर्ण काळजी, श्रद्वेसोबत पर्यटनाची पर्वणी
· दोन कोटीहून अधिक भाविकांची हजेरी
· नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये कायमस्वरुपी विकास कामे
· कायदेशी अडचणी दूर करुन वारीचीही संकल्पपूर्ती
· हरित कुंभ : स्थायी स्वरुपाची विकासकामे.2 कोटी भाविक-पर्यटकांची चोख व्यवस्था.कुठलीही अनुचित घटना नाही. जगभरातून प्रशंसा.
पोलीस प्रशासन..
· देशातील सर्वोत्तम व अत्याधुनिक पोलीस दलाकडे वाटचाल
· पुणे-पिंपरी-चिंचवड सीसीटीव्ही निगराणीत ; देशातील पहिले 
· राज्यातील सर्व पोलीस ठाणी ऑनलाईन,पेपरलेस
· 2 कोटी 6 लाख पोलिसांना सुट्टीच्या दिवशी काम केल्यास पूर्ण वेतन
· 15 वर्षातील दीड कोटी गुन्ह्यांचा डाटा एका क्लिकवर
· अपराध सिध्दतेचा दर 8 वरुन 42 टक्यांवर 
सामाजीक न्याय....
· वर्षानवर्षे रखडलेल्या इंइू मिल स्मारकाचे भूमिपूजन
· प्रत्येक जिल्ह्यात जात प्रमाणपत्र पडताळणी समिती
· डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन वास्तव्यातील घराची खरेदी
· 25 हजार आदिवशी विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत प्रवेश
· डॉ.आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षासाठी रुपये 125 कोटी
· अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादा रुपये 2.5 वरुन रु.6 लाखावर
महाराष्ट्राच्या प्रगतीचे
· रस्ते,रेल्वे,मेट्रो विमानतळ,कोस्टलरोड, 10 स्मार्ट सिटी, अमृत योजनेमध्ये 43 शहरे
· एलबीटीतून दिली राज्याला मुक्ती
· टोलमुक्तीचे आश्वासनही पाळले
· भारनियमनातून राज्याला मुक्ती ; विजेचे दरही कमी
· 30 हजार कोटींचा नागपूर-मुंबई सुपर एक्सप्रेस कम्युनिकेशन्स वे 
· आयआयएम,आयआयआयटी, एआयआयएमएस च्या माध्यमातून शिक्षणाची गंगोत्री
· सुलभ आणि उत्तम शिक्षण : दहावीच्या फेरपरीक्षेमुळे लाखावर विद्यार्थ्यांचे वर्ष वाचविले. दप्तराचे ओझे कमी. प्रवेश आणि शिक्षणशुल्क नियमन कायदा. एम्स, आयआयएम, आयआयआयटीच्या माध्यमातून शिक्षणाची गंगोत्री मुंबई,औरंगाबाद,  आणि नागपूरात राष्ट्रीय विधी विद्यापीठ. 
· आर्थीक दिलासा : महिलांसाठी व्यवसायकर आकारणी रुपये 7 हजार 500 रुपये 10 हजार. एकुलते एक अपत्य असलेल्या शासकीय कर्मचा:यांचा मृत्यू झाल्यास माता-पित्यांना पेन्शन, विधवा महिलेने पुनर्विवाह केल्यास पेन्शन सुरुच राहणार.
· महिला सक्षमीकरण : चंद्रपूर जिल्हा दारुमुक्त, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मानधनात वाढ.
· तरुणांना कौशल्य प्रशिक्षण : राज्यात कौशल्यविकास व उद्योजकता विभागाची स्थापना, प्रमोद महाजन कौशल्य विकास कार्यक्रमासाठी रुपये 161 कोटी. 
· सामन्यांना सहारा, हक्काचा निवारा : शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाला रुपये 500 कोटी. झोपडपट्टी पुनर्वसन आणि परवडणाऱ्या किंमतीत प्रत्येकाला घर. 
                            *****     

अशोक माळगे, दुरमुद्रकचालक
        जिमाका, उस्मानाबाद

 
Top