पांगरी (गणेश गोडसे) :- धानोरे (द) ता. बार्शी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राऊत गटाच्या यमाई देवी ग्रामविकास आघाडीचे सुमंत गोरे यांची तर उप-सरपंच पदीही त्याच आघाडीच्या लक्ष्मी पाटील यांची बिनविरोध निवड झाली.निवडीवेळी सुमंत गोरे,संतोष शिंदे,लक्ष्मी पाटील,शिवानी जमदाडे,मैनाबाई लोहार,सतीश लोहार,पद्मिनी झोंबाडे हे सातही नवनियुक्त सदस्य हजर होते.सरपंच व उपसरपंच पदासाठी प्रत्येकी एकाच उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकार्यांनी बिनविरोध निवडी झाल्याची घोषणा केली.
यावेळी पिंटू वडगणे,रमेश शिंदे,भगवान गोरे,माजी सरपंच पाटील,प्रभाकर चव्हाण,रामचंद्र गोरे,संजय गोरे,तानाजी चव्हाण,नवनाथ चव्हाण,जयवंत गोरे,श्रीमंत जमदाडे,शंकर विभूते,विशाल विभूते,शिवप्पा जमदाडे,उतरेश्वर जमदाडे,धंनंजय गोरे,नवनाथ गोरे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडिंनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत व गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला.नूतन पदाधिकार्यांना व एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला.यावेळी सरपंच,उप-सरपंच यांचा व सर्व सदस्यांचा ग्रामस्थांनी सत्कार केला.