पांगरी (गणेश गोडसे) -: घर बंद असल्याची संधी साधून कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांसह पावणेदोन लाख रुपयांचा माल चोरून नेल्याची घटना मांडेगांव ता.बार्शी येथे घडली. प्रकाश चंद्र्कांत मिरगणे असे चोरी झालेल्याचे नांव आहे.
प्रकाश मिरगणे यांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,रात्री ते जेवण उरकून त्यांच्या घराशेजारी एकाच्या शेतात कूपनलिकेसाठी आलेल्या बोअर मशीनपाशी जावून थांबले होते.रात्री त्यांनी घरी येऊन पाहणी केली असता घराचे गेट व दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी घरात जावून पाहणी केली असता कपाटातील प्लास्टीकच्या डब्ब्यात ठेवलेले रोख 7 हजार रुपयांसह 125000 रुपये किमतीच्या पन्नास ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या पाटल्या,25 हजार रुपयांची 10 ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाल,सात हजार रुपयांची 3 ग्रॅमची अंगठी,पाच हजार रुपयांची दोन ग्रॅम वजनाच्या दोन रिंगा असा माल चोरून नेला असे म्हटले आहे.
पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोर्ट्यांविरुद्ध संमतीशिवाय मुद्दाम लबाडीने घरात प्रवेश करून पावणेदोन लाख रुपयांचा माल चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनास्थळास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत अमृतकर,पांगरीचे स. पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी भेट देऊन पाहणी केली.अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.