उस्मानाबाद -: जिल्हृयातील आजी सैनिक/माजी सैनिक/विधवांच्या पाल्यांना कळविण्यात येते की, मॅकेनिज इंफंन्ट्री सेंटर,अहमदनगर येथे दि.11 जानेवारी पासून युनिट हेडक्वार्टर कोटा सैन्य भरती मळावा आयोजित करण्यात आला आहे. तरी जिल्हृयातील आजी /माजी सैनिक/विधवांच्या इच्छुक पाल्यांनी दि. 11 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजता अहमदनगर येथे भरतीसाठी उपस्थित रहावे व सोबत शैक्षणिक प्रमाणपत्र,डोमिसाईल प्रमाणपत्र,जातीचा दाखला,चारित्र्याचा दाखला व इतर सर्व कागदपत्रे सोबत घेवून जावे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,उस्मानाबाद,मेजर (नि)सुभाष सासने,यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.