उस्‍मानाबाद -: आकाशवाणी उस्‍मानाबाद केंद्राच्‍या १९ व्‍या वर्धापन दिनानिमित्‍त बुधवार दि. ९ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता 'अोवी ते लावणी' हा लोकगीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला आहे. 
        हा कार्यक्रम लोकमाहिती अभियान अंतर्गत आयोजित करण्‍यात आला असून उस्‍मानाबाद शहरातील जि.प. कन्‍या प्रशाला येथे हा कार्यक्रम संपन्‍न होणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन जिल्‍हा परिषेदेचे अध्‍यक्ष अॅड. धिरज पाटील यांच्‍या करण्‍यात येणार असून कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी जिल्‍हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे हे तर प्रमुख पाहुणे म्‍हणून जिल्‍हा पोलीस अधिक्षक अभिषेक त्रिमुखे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
       'ओवी ते लावणी' या कार्यक्रमात शाहिर तुकाराम ठोंबरे आणि त्‍यांचे सहकारी हा कार्यक्रम सादर करणार आहेत. या कार्यक्रमात महाराष्‍ट्राच्‍या लोक परंपरेचे दर्शन रसिकांना होणार आहे. तरी रसिक श्रोत्‍यांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्‍येनी उपस्थित राहण्‍याचे आवाहन उस्‍मानाबाद आकाशवाणीचे  केंद्रप्रमुख संजय बरिदे यांनी केले आहे.
 
Top