उस्मानाबाद :- जिल्हृयातील उपविभाग भूम अंतर्गत पोलीस पाटील यांची 97 पदे रिक्त असून या रिक्त पदे भरतीचे अनुशंगाने आरक्षण सोडत दि.7 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समिती सभागृह, भूम येथे काढण्यात येणार आहे. पोलीस पाटील यांचे ज्या गावातील पद भरावयाचे आहे त्या सबंधीत गावात जाहीर प्रकटन प्रसिध्द करण्यात आले असून या आरक्षण सोडतीस नागरीकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी, भूम यांनी केले आहे.                                     
 
Top