उस्मानाबाद :- महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या उस्मानाबाद शहर शाखेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी सज्जीयोद्दीन शेख, कार्याध्यक्षपदी भाग्यश्री केसकर तर सचिवपदी राकेश वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या भाई उध्दवराव पाटील सभागृहात अंनिसचे जिल्हाध्यक्ष एम. डी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली अंनिसच्या सदस्यांची बैठक् नुकतीच पार पडली. यावेळी निवडण्यात आलेली कार्यकारिणी अशी, अध्यक्ष सजीयोद्दीन शेख, कार्याध्यक्ष भाग्यश्री केसकर, सचिव राकेश वाघमारे, उपाध्यक्ष बालाजी तांबे, वैज्ञानिक जाणिवा सचिवपदी महादेव कांबळे, सहसचिव दीपक ढवळे, बुवाबाजी संघर्ष समिती सचिव विश्वदीप खोसे, महिला सचिव विजया मेटे, वार्तापत्र विभागप्रमुख सत्यजीत सिरसाट, मनीषा कुलकर्णी, युवा सहभाग सचिव अमर आकळेे, अजय वागळे, सर्पविज्ञान सचिव धम्मपाल बनसोडे, व्यसनमुक्ती सचिवपदी डॉ. सतीश पवार, अमोल गाडे, प्रकाशक सचिवपदी तानाजी माने, अॅड. गोपाळ पाखले, विविध उपक्रम सचिवपदी श्रीकांत पाटील, सुभाष चव्हाण, प्रसिध्दीप्रमुख शितल वाघमारे, सांस्कृतिक विभाग सचिव अब्दुल लतीफ, सहसचिव गोकुळदास नेरे, तर सल्लागार म्हणून अॅड. देवीदास वडगावकर, अॅड. रवी मैंदाड, अॅड. वा. मा. वाघमारे, अॅड. दयानंद देंडे यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर जिल्हाध्यक्ष एम. डी. देशमुख यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी, सदस्यांचे अभिनंदन केले.