पांगरी :- एकाने अज्ञात कारणावरून स्वत; गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना बाभळगांव ता.बार्शी शिवारात उघडकीस आली आहे.चंद्र्कांत उर्फ नाना महादेव आडसूळ वय 40 रा.बाभळगांव असे गळफास लावून घेऊन आत्महत्या केलेल्याचे नांव आहे.
शहाजी विश्वनाथ आडसूळ यांनी याबाबत पांगरी पोलिसात खबर दिली आहे.मयत चंद्र्कांत आडसूळ यांनी अज्ञात कारणावरून भरत निवृती शिंदे यांच्या शेतातील चिंचेच्या झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे खबरीत म्हटले आहे.पांगरी पोलिसात अकस्मात मयत म्हणून गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास हवालदार सुधाकर ठाकर हे करत आहेत.