उस्मानाबाद :- उस्मानाबाद येथे आयोजित लोक माहिती अभियानांतर्गत बुधवारी सकाळी पावणेसात वाजता आयुर्वेद महाविद्यालयाच्या सहकार्याने योग शिबीर घेण्यात आले. या शिबीराचा लाभ जि.प.कन्या प्रशाला व आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थींनी घेतला.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत पत्र सूचना कार्यालयातर्फे आयोजित या अभियानात प्रथमच योग शिबिराचा समावेश करण्यात आला होता. या शिबीरासाठी खास तहसिलदार सुभाष काकडे, नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी राजेश जाधव, पत्र सूचना कार्यालयाचे सहाय्यक संचालक नितीन सप्रे व कन्हैया नुनसे हे उपस्थित होते.
आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ.एन.बी.स्वामी यांनी उपस्थितांना योगाचे धडे दिले. तसेच योग व प्राणायामाचे महत्वही सांगितले. प्राणायाम व योगामुळे विद्यार्थ्यांच्या एकग्रत वाढ होवून स्मरणशक्ती वाढते असे, त्यांनी सांगितलेे. याप्रसंगी डॉ.स्वामी यांनी योग व प्राणायाचे प्रत्यक्षिक उपस्थितांकडून करून घेतले. याप्रसंगी बी.एन. अंबेकर, मंडळ अधिकारी खोत, आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ.मुकुंद बामणीकर उपस्थित होते.