तुळजापूर :- बारुळ (ता. तुळजापूर) येथे पशुसंवर्धन विभागामार्फत कामधेनू दत्‍तक ग्रामयोजनेंतर्गत जनावरासाठी वंध्‍यत्‍व निवारण शिबीराचे आयोजन करण्‍यात आले होते. 
         या शिबीरामध्‍ये जंत, खरकुत, गोचिड यासारख्‍या रोगावर लसीकरण करण्‍यात आले. या शिबीराचे उदघाटन बारुळचे सरपंच सुभाष पाटील यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी ग्रा.पं. सदस्‍य शहाजी सुपनार, कुमार सुपनार, भास्‍कर क्षिरसागर, बाबुराव ठोंबरे, माणिक वट्टे यांच्‍यासह गावातील पशुपालक वर्ग उपस्थित होता. 
        या शिबीरात भाकड, दुध न देणा-या जनावरांची विशेष अशी तपासणी करण्‍यात आली. या लसीकरणासाठी व शिबीरासाठी डॉ. अशोक कुलकर्णी, डॉ. रेड्डी, डॉ. कोळेकर, डॉ. खरोशे, डॉ. गुरव व परिचर सुर्यवंशी यांनी काम पाहिले.
 
Top