उमरगा : नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा बोलवताना केलेल्या अनियमिततेबाबत उमरगा येथील न.प.च्या नगराध्यक्षा केवलबाई औरादे यांना नगरविकास विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.. सदर नोटीसाचा खुलासा पंधरा दिवसात करण्यास सांगितले आहे.
उमरगा येथील नगरपरिषेदेचे नगरसेवक अब्दुल रज्जाक अत्तार व इतर सदस्यांनी ३0 ऑक्टोबरला नगर विकास विभागाकडे केलेल्या तक्रारीवरून सदरील नोटीस बजावण्यात आली आहे. नगरविकास विभागाने ३१ ऑक्टोबर रोजी याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांना दिल्या होत्या.यानंतर २0नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी विभागीय आयुक्तांकडे तर ३0रोजी विभागीय आयुक्तांनी नगरविकास विभागाच्या अवर सचिवांकडे यासंदर्भातील चौकशी अहवाल सादर केला होता.