वाशी : नवनिर्मित वाशी व लोहारा नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या दोन्ही शहराच्या नगर पंचायतीसाठी १० जानेवारी रोजी मतदान होणार आहे. शुक्रवारपासून या दोन्ही शहरात आचार संहिता लागू झाली आहे. 
वाशी व लोहारा तालुक्याच्या ठिकाणी यापूर्वी ग्रामपंचायत अस्तित्वात होती. शासनाने तालुका ठिकाणच्या ग्रामपंचायत बरखास्त करून नगर पंचायतीची निर्मिती केली आहे. निवडणूक आयोगाने शुक्रवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. ८ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी नोटीस प्रसिद्ध करणार आहेत. १० ते १७ डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशनपत्रे विक्री व स्विकारली जाणार आहेत. सुट्टीच्या दिवशी अर्ज स्विकारले जाणार नाहीत. १८ रोजी नामनिर्देशनपत्रांची छाणणी होणार आहे. २८ डिसेंबर हा अर्ज मागे घेण्याची अंतिम दिवस आहे. ४ जानेवारी रोजी मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. १० जानेवारीला मतदान होणार आहे. ११ जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
 
Top