एस.के. गायकवाड
     ''सारे सुरक्षित, सारे सुखत, अशी दिवाळी होवो प्रत्‍येक घरात'' अशी सदिच्‍छा व्‍यक्‍त करत तुळजापूर लाईव्‍हच्‍यावतीने काढण्‍यात आलेला दिपरंग दिवाळी विशेषांक हा समाजातील सर्व विषयांना स्‍पर्श करणारा सर्व समावेशक असा अंक असून संपादक शिवाजी नाईक यांनी केलेला हा पहिला प्रयत्‍न एक यशस्‍वी प्रयत्‍न असचं म्‍हणावे लागेल.
            ग्रामीण भागातून तुळजापूर लाईव्‍ह हे ई-न्‍यूज पोर्टल चालवित असताना प्रिंट मिडियालाही तितकेच महत्‍त्‍व आहे, हे लक्षात घेवून ज्‍येष्‍ठ विचारवंत पन्‍नालाल भाऊ सुराणा बरोबरच नळदुर्ग व परिसरातील नवोदित लेखक, कवी यांच्‍याशी संपर्क साधून सत्‍यकथा, विनोदी कथा, यशोगाथा, पर्यटन विशेष, महिला विशेष, आरोग्‍य विषयक, युवाजगत, व्‍यक्‍ती विशेष आदी विषयावर समाजप्रबोधन पर लेख संकलित करुन ते आपल्‍ज्‍या दिपरंग या दिवाळी अंकात छापून युवकांना एक वेगळी दिशा देण्‍याचा संपादक शिवाजी नाईक यांनी केलेला अल्‍पशा प्रयत्‍न हा अभिनंदनिय आहे. त्‍यांच्‍या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्‍छा...!

- एस.के. गायकवाड
रिपाइं तुळजापूर तालुकाध्‍यक्ष 
मु.पो. वागदरी, ता. तुळजापूर
 
Top