विसरु नको रे पाण्याचे महत्त्व
त्याच्या वीन नाही जीवन
पशू-पक्षी अन् प्रत्येक सजीव
अवलंबून आहे पाण्यावर रे वेड्या
पाण्यासाठी तू भटकशील वणवण ||धृ||
लोकसंख्येची तर वृध्दी
केलीस तू वृक्ष तोडी
तापमान वाढले भूमीचे
ही जान ठेव रे थोडी
जमिनीवरती बोर पाडूनी
चाळणी केलीस तू काया रे
पाण्यासाठी तू भटकशील वणवण ||१||
तुझ मिळेल सोनं, नाणं
कपडे लत्ते, ऐश आराम
कशासोबत यांना उपभोगशी
याचा कर तू विचार
जीवनामधले अनमोल पाणी
नकाे घालवू वाया रे
पाण्यासाठी तू भटकशील वणवण ||२||
पाऊस पडला असता
तू नाही त्याला आवडले
बांध, बंधारे घालून
नाही त्याला टिकवले
वृक्षलागवड उपाय त्याजवर
धूप थांबवी जमिनीची रे वेड्या
पाण्यासाठी तू भटकशील वणवण ||३||
शेततळे अन् सांडपाणी
पावसाळ्यातील घरावरचे पाणी
आडवा-जिरवा मंत्र घ्या ध्यानी
म्हणून सांगते केविलवाणी रे वेड्या
पाण्यासाठी तू भटकशील वणवण ||२||
- श्रीमती मनिषा महादेव क्षिरसागर
सहशिक्षिका, जि.प.प्रा. शाळा बारुळ,
ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद