पुणे :- एका सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीने आत्‍महत्‍या केल्‍याची खटना पिंपरी चिंचवड येथे घडली आहे. आत्‍महत्‍येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
तपस्‍या भास्कर असे आत्महत्या करणार्‍या इंजिनिअर तरुणीचं नाव आहे. तपस्या ही मुळची जयपुरची रहिवासी होती. तपस्या भास्कर ही हिंजवडीतील पर्सिस्टन्स या नामांकित आयटी सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनिअर म्‍हणून कार्यरत होती. शहरातील जगताप डेअरी परिसरात असलेल्या बोरा हैपी होम सोसायटीमध्ये ती एका भाड्याच्या खोलीत एकटीच राहत असे. रविवारी तपस्या तिच्या घरमालकांना दर महिना ठरलेलं घरभाडं देणार होती, त्यानुसार घरमालक तिच्याकडे भाडं मागण्यांसाठी गेले. मात्र, बराच प्रयत्न करून ही तपस्या दार उघडत नसल्याने पोलिसांना बोलवण्यात आलं आणि त्यानंतर आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला.
तपस्याच्या मृतदेहावरील नाका तोंडाजवळ जखमा होत्या आणि रक्तस्त्राव होत असल्याची माहिती मिळतीये. तपस्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. मात्र ज्या परिस्थिती तपस्याचा मृतदेह आढ़ळला त्यानुसार तपस्याने आत्महत्या केली आहे की तिची हत्या करण्यात आली असा संशय निर्माण झालाय.
 
Top